१३ वर्षांखालील (किंवा तुमच्या देशातील लागू वय) मुलांच्या पालकांसाठी Family Link डिस्क्लोजर

१३ वर्षांखालील (किंवा तुमच्या देशातील लागू वय) लहान मुलांसाठी Family Link वापरून व्यवस्थापित केली जाणारी Google खाती आणि प्रोफाइल यांसाठी गोपनीयतेची सूचना पहा

पालकांनो तुमचे स्वागत आहे!

तुमचा विश्वास आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे आणि तुमच्या लहान मुलाला Google खाते देणे हा मोठा निर्णय आहे. अधिक जाणून घेण्यासाठी या महत्त्वाच्या माहितीचे पुनरावलोकन करण्याकरिता थोडा वेळ द्या.

तुमच्या लहान मुलाचे Google खाते

तुमच्या लहान मुलाचे Google खाते हे तुमच्या स्वतःच्या खात्यासारखे असते आणि लहान मुलांसाठी डिझाइन न केलेल्या किंवा त्यांच्यासाठी अनुकूल न केलेल्या सेवांच्या समावेशासह Google च्या उत्पादनांचा आणि सेवांचा अ‍ॅक्सेस देते. तुमचे लहान मूल पुढील गोष्टी करण्यासाठी त्याचे खाते वापरू शकेल:

  • Google Assistant, Chrome आणि Search वापरून प्रश्न विचारा, इंटरनेट अ‍ॅक्सेस करा आणि त्यावर शोधा;

  • Gmail, एसएमएस, व्हिडिओ, व्हॉइस आणि इतर संवादाच्या पद्धती वापरून इतरांशी संवाद साधा;

  • अ‍ॅप्स, गेम, संगीत, चित्रपट आणि आणखी बर्‍याच गोष्टी डाउनलोड करा, खरेदी करा आणि त्यांचा आनंद घ्या;

  • फोटो, व्हिडिओ, प्रेझेंटेशन, दस्तऐवज आणि इतर आशय तयार करा, पहा आणि शेअर करा;

  • अ‍ॅक्टिव्हिटीची पातळी व हार्ट रेटसह आरोग्य आणि फिटनेसविषयीची माहिती Google Fit मध्ये ट्रॅक करा (तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसनुसार);

  • Google च्या सेवा वापरत असताना संदर्भातील जाहिराती पहा.

Family Link आणि पालक पर्यवेक्षण

Google चे Family Link अ‍ॅप तुम्हाला मूलभूत नियम सेट करण्यात मदत करण्यासाठी आणि तुमच्या लहान मुलाला ऑनलाइन एक्सप्लोर करण्याचा अनुभव घेण्यात मार्गदर्शन करण्याकरिता डिझाइन केले आहे. तुमचे लहान मूल हे Google कुटुंब गट याचा भाग बनेल. तुमच्या लहान मुलासोबत आणि इतर कमाल चार कुटुंब सदस्यांसोबत Google सेवा शेअर करण्यासाठी तुम्ही हा कुटुंब गट वापरू शकता. तुमच्या लहान मुलाच्या खात्याचे पर्यवेक्षण करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही दुसर्‍या पालकांना नंतर जोडू शकता. पालक पुढील गोष्टी करण्यासाठी Family Link वापरू शकतात जसे की:

  • तुमच्या लहान मुलाच्या Android किंवा ChromeOS डिव्हाइसवर स्क्रीन वेळ मर्यादा सेट करणे;

  • तुमच्या लहान मुलाच्या साइन-इन केलेल्या आणि अ‍ॅक्टिव्ह Android डिव्हाइसचे स्थान पाहणे;

  • तुमच्या लहान मुलाच्या Google Play आणि Stadia वरील डाउनलोड आणि खरेदीला मंजुरी देणे किंवा मॅच्युरिटी रेटिंगनुसार आशयाची दृश्यमानता मर्यादित करणे;

  • तुमच्या लहान मुलाला त्याच्या Google खाते मध्ये सेव्ह केल्या जाऊ शकणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीचे प्रकार आणि त्याचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी ते कसे वापरले जाऊ शकतात हे निवडण्यात मदत करणे;

  • Google Search साठी सुरक्षितशोध यासारखी सेटिंग्ज व्यवस्थापित करणे;

  • तुमच्या लहान मुलाच्या अ‍ॅप परवानग्यांचे पुनरावलोकन करणे, जसे की Android आणि ChromeOS वरील मायक्रोफोन, कॅमेरा व संपर्क अ‍ॅक्सेस;

  • YouTube आणि YouTube Kids सह, YouTube अनुभवांसाठी (जिथे उपलब्ध असेल तेथे) आशय, अ‍ॅक्सेस व इतर सेटिंग्ज बदलणे.

Family Link ची पालक नियंत्रणे तुम्हाला तुमच्या लहान मुलाच्या अनुभवाचे पर्यवेक्षण करण्यात आणि तो व्यवस्थापित करण्यात मदत करत असताना, त्यामध्ये काही मर्यादा आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे:

  • Family Link ची पालक नियंत्रणे वेबवर व्यवस्थापित करणे हे अनेक नियंत्रणांच्या बाबतीत केले जाऊ शकत असले, तरीही स्क्रीन वेळ मर्यादा यांसारखी ठरावीक वैशिष्‍ट्ये व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्याकडे Android किंवा iOS वर Family Link अ‍ॅप असणे आवश्यक आहे.

  • सुरक्षितशोध, Chrome वेबसाइटवरील बंधने आणि Play Store फिल्टर यांच्यासारखी सेटिंग्ज अयोग्य आशयाचा अ‍ॅक्सेस मर्यादित करण्यात मदत करू शकतात, पण ती परिपूर्ण नाहीत. ही नियंत्रणे सुरू असली तरीही तुमच्या लहान मुलांनी पाहू नये असा तुम्हाला वाटत असलेला आशय ती अ‍ॅक्सेस करू शकतात.

  • तुमचे लहान मूल आधी मंजुरी दिलेले अ‍ॅप किंवा इतर आशय पुन्हा डाउनलोड करत असताना, अ‍ॅपवर अपडेट इंस्टॉल करत असताना (जरी त्या अपडेटद्वारे आशय समाविष्ट केला जाणार असेल किंवा अतिरिक्त डेटा किंवा परवानग्यांची मागणी केली जाणार असेल तरी) किंवा तुमच्या Google Play कौटुंबिक लायब्ररी वरून शेअर केलेला आशय डाउनलोड करत असताना पालकांच्या मंजुरीची आवश्यकता नाही.

  • काही Family Link वैशिष्ट्यांची उपलब्धता मर्यादित आहे आणि ती काम करण्यासाठी विशिष्ट सेटिंग्ज व परिस्थिती आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अ‍ॅप्स ब्लॉक करणे हे फक्त तुमच्या लहान मुलाने कंपॅटिबल Android किंवा ChromeOS डिव्हाइसमध्ये साइन इन केल्यावर उपलब्ध आहे आणि Family Link अ‍ॅपमध्ये तुमच्या लहान मुलाचे डिव्हाइस स्थान पाहणे हे फक्त त्याचे Android डिव्हाइस सुरू असताना व इंटरनेटशी कनेक्ट केलेले असताना उपलब्ध आहे.

तुमचे लहान मूल १३ वर्षांचे झाल्यावर (वय हे देशानुसार बदलू शकते), ते त्याचे स्वतःचे खाते तुमच्या पर्यवेक्षणाशिवाय व्यवस्थापित करण्याचे निवडू शकेल.

इतरांचा आदर करा

आमच्या अनेक सेवा तुमच्या लहान मुलाला आमच्या सेवा वापरणाऱ्या इतर लोकांशी संवाद साधू देतात. आम्हाला सर्वांसाठी आदरयुक्त वातावरण ठेवायचे आहे. याचा अर्थ असा, की तुमच्या लहान मुलाने आमच्या सेवा वापरताना वर्तनाविषयीच्या मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जसे की इतरांशी किंवा स्वतःशी गैरवर्तन न करणे अथवा हानी न पोहोचवणे (किंवा अशा गैरवर्तनाची अथवा हानीची धमकी न देणे किंवा त्यास प्रोत्साहन न देणे) - उदाहरणार्थ, इतरांची दिशाभूल, फसवणूक, बदनामी, छळ, पाठलाग करणे, त्यांसोबत गुंडगिरी करणे अथवा द्वेषपूर्ण आशय (जसे की लोकांचे मूळ, वंश, धर्म, लिंग, लैंगिक प्राधान्य इत्यादींच्या आधारावर द्वेष किंवा भेदभाव उत्पन्न करणारा आशय) सार्वजनिकरीत्या वितरित करणे. द्वेषपूर्ण आशय प्रकाशित केल्यामुळे, तुम्हाला आणि तुमच्या लहान मुलाला नागरी किंवा गुन्हेगारी दायित्वाचा सामना करावा लागू शकतो.

तुमच्या लहान मुलाची गोपनीयता

तुमच्या लहान मुलाकडे त्यांचे स्वतःचे Google खाते किंवा प्रोफाइल असावी यासाठी ही गोपनीयता सूचना आणि Google गोपनीयता धोरण यांमध्ये वर्णन केल्यानुसार, आम्हाला तुमच्या लहान मुलाची माहिती गोळा करणे, वापरणे अथवा डिस्क्लोज करणे यांसाठी तुमची परवानगी आवश्यक असू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या सेवा वापरण्याची परवानगी देता, तेव्हा तुम्ही व तुमचे लहान मूल तुमच्या माहितीविषयी आमच्यावर विश्वास ठेवता. आम्हाला समजते आहे, की ही एक मोठी जबाबदारी आहे आणि सर्व काही तुमच्या नियंत्रणामध्ये असावे, यासाठी आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण करण्याकरिता कठोर परिश्रम करतो. वेब व अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, YouTube इतिहास आणि लागू असतील त्या भागांमध्ये ठरावीक Google सेवांना लिंक करणे यांसारख्या गोष्टींसाठी तुमचे लहान मूल त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल व्यवस्थापित करू शकते का ते निवडणे हे तुम्ही करू शकता.

ही Google खाती आणि १३ वर्षे (किंवा तुमच्या देशातील लागू वय) यापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी Family Link वापरून व्यवस्थापित केलेल्या प्रोफाइल यांसाठीची गोपनीयतेची सूचनाGoogle गोपनीयता धोरण या गोष्टी Google चे गोपनीयता व्यवहार स्पष्ट करतात. पर्सनलाइझ केलेल्या जाहिरातींवरील मर्यादा यांसारखे तुमच्या लहान मुलाच्या खात्याशी किंवा प्रोफाइलशी संबंधित असलेले काही गोपनीयता व्यवहार आहेत आणि हे फरक ही गोपनीयतेची सूचना यामध्ये नमूद केले आहेत.

ही गोपनीयतेची सूचना तुमच्या लहान मुलाद्वारे वापरल्या जाऊ शकणाऱ्या कोणत्याही तृतीय पक्ष (Google नसलेल्या) अ‍ॅप्स, कृती किंवा वेबसाइट यांच्या पद्धतींना लागू होत नाही. तुमच्या लहान मुलासाठी तृतीय पक्ष अ‍ॅप्स, कृती आणि साइटच्या योग्यतेचे निर्धारण करण्यासाठी त्यांच्या डेटा संग्रह व वापर पद्धतींबरोबरच लागू असलेल्या अटी आणि धोरणांचे तुम्ही पुनरावलोकन केले पाहिजे.

आम्ही गोळा करत असलेली माहिती

तुम्ही तुमच्या लहान मुलाला Google खाते किंवा प्रोफाइल असण्याची परवानगी दिल्यानंतर, त्याचे खाते अथवा प्रोफाइल सामान्यतः आम्ही गोळा केलेल्या माहितीच्या संदर्भात तुमच्या स्वतःच्या खात्यासारखे हाताळले जाईल. उदाहरणार्थ, आम्ही पुढील माहिती गोळा करतो:

तुम्ही आणि तुमचे लहान मूल तयार करत असलेली किंवा आम्हाला देत असलेली माहिती.

खाते किंवा प्रोफाइल तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, आम्ही नाव आणि आडनाव, ईमेल अ‍ॅड्रेस व जन्मतारीख यांसारखी वैयक्तिक माहिती विचारू शकतो. तुम्ही किंवा तुमच्या लहान मुलाने दिलेली माहिती, जसे की तुमचे ऑनलाइन संपर्क तपशील, आम्ही गोळा करतो; ही माहिती संमतीची विनंती करताना तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असते. आम्ही तुमच्या लहान मुलाने त्यांचे खाते किंवा प्रोफाइल वापरताना तयार केलेली, अपलोड केलेली अथवा इतरांकडून मिळवलेली माहितीदेखील गोळा करतो, जसे की जेव्हा तुमचे लहान मूल Google Photos मध्ये फोटो सेव्ह करते किंवा Google Drive वर दस्तऐवज तयार करते.

तुमच्या लहान मुलाने आमच्या सेवा वापरल्यामुळे आम्हाला मिळणारी माहिती.

तुमचे लहान मूल वापरत असलेल्या सेवा आणि तुमचे लहान मूल त्या कशा वापरते याबद्दलची ठराविक माहिती जसे की, तुमचे लहान मूल Google Search मध्ये क्वेरी एंटर करते, Google Assistant शी बोलते किंवा YouTube Kids वर व्हिडिओ पाहते तेव्हा, ती माहिती आम्ही आपोआप गोळा करतो. या माहितीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:

  • तुमच्या मुलाची अ‍ॅप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस

    आम्ही तुमचे लहान मूल Google सेवा ॲक्सेस करण्यासाठी वापरत असलेली ॲप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस यांबद्दलची माहिती गोळा करतो, ज्यामध्ये युनिक आयडेंटिफायर, ब्राउझरचा प्रकार व सेटिंग्ज, डिव्हाइसचा प्रकार आणि सेटिंग्ज, ऑपरेटिंग सिस्टीम, वाहकाचे नाव व फोन नंबरसह मोबाइल नेटवर्क माहिती आणि ॲप्लिकेशन आवृत्ती क्रमांकाचा समावेश आहे. तुमच्या लहान मुलाची अ‍ॅप्स, ब्राउझर आणि डिव्हाइसच्या आमच्या सेवांसोबतच्या परस्पर संवादाबद्दलची माहितीदेखील आम्ही गोळा करतो, ज्यामध्ये आयपी अ‍ॅड्रेस, क्रॅश अहवाल, सिस्टीम अ‍ॅक्टिव्हिटी तसेच तारीख, वेळ आणि तुमच्या लहान मुलाच्या विनंतीच्या रेफरर URL चा समावेश आहे. उदाहरणार्थ तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसवरील Google सेवा आमच्या सर्व्हरशी संपर्क साधते, तेव्हा आम्ही ही माहिती गोळा करतो, जसे की ते जेव्हा Play Store वरून एखादे अ‍ॅप इंस्टॉल करते.

  • तुमच्या लहान मुलाची अ‍ॅक्टिव्हिटी

    तुमच्या लहान मुलाच्या सेटिंग्जनुसार आमच्या सेवांमध्ये आम्ही तुमच्या लहान मुलाच्या अ‍ॅक्टिव्हिटीविषयी माहिती गोळा करतो, ज्या माहितीचा वापर आम्ही त्यांना Google Play वर आवडू शकतील अशा अ‍ॅप्सची शिफारस करण्यासाठी करतो. तुमचे लहान मूल त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल व्यवस्थापित करू शकते का ते निवडणे हे तुम्ही करू शकता. आम्ही गोळा करत असलेल्या तुमच्या लहान मुलाच्या ॲक्टिव्हिटीशी संबंधित माहितीमध्ये शोध संज्ञा, ते पाहतात ते व्हिडिओ, त्यांनी ऑडिओ वैशिष्ट्यांचा वापर करतानाची व्हॉइस आणि ऑडिओ माहिती, ज्या लोकांशी ते संवाद साधतात किंवा आशय शेअर करतात व त्यांच्या Google खाते शी सिंक केलेला Chrome ब्राउझिंग इतिहास अशा गोष्टींचा समावेश असू शकतो. तुमचे लहान मूल कॉल करण्यासाठी अथवा तो घेण्यासाठी अथवा मेसेज पाठवण्यासाठी व मिळवण्यासाठी आमच्या सेवा वापरत असल्यास, उदाहरणार्थ Google Meet किंवा Duo वापरत असल्यास, आम्ही टेलिफोनविषयक लॉग माहिती गोळा करू शकतो. तुमचे लहान मूल त्यांच्या खात्यामध्ये किंवा प्रोफाइलमध्ये सेव्ह केलेली अ‍ॅक्टिव्हिटीशी संबंधित माहिती शोधण्यासाठी व व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्या Google खाते ला भेट देऊ शकते आणि तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या Google खाते मध्ये साइन इन करून अथवा Family Link मध्ये त्यांची प्रोफाइल अ‍ॅक्सेस करूनदेखील त्यांची ॲक्टिव्हिटीशी संबंधित माहिती व्यवस्थापित करण्यात मदत करू शकता.

  • तुमच्या लहान मुलाची स्थान माहिती

    तुमचे लहान मूल आमच्या सेवा वापरते, तेव्हा आम्ही त्यांच्या स्थानाबद्दलची माहिती गोळा करतो. तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसच्या GPS, आयपी ॲड्रेस, सेन्सर डेटाचा वापर करून तसेच त्यांच्या डिव्हाइसजवळील गोष्टी जसे की वाय-फाय ॲक्सेस पॉइंट, सेल टॉवर आणि ब्लूटूथ सुरू असलेली डिव्हाइस यांच्या माहितीवरून त्यांचे स्थान निर्धारित केले जाऊ शकते. आम्ही गोळा करत असलेल्या स्थान डेटाचे प्रकार काही प्रमाणात तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जवर आणि तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जवर अवलंबून असतात.

  • तुमच्या लहान मुलाची व्हॉइस आणि ऑडिओ माहिती

    आम्ही तुमच्या लहान मुलाची व्हॉइस आणि ऑडिओ माहिती गोळा करू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या लहान मुलाने ऑडिओ ॲक्टिव्हेशन कमांड वापरल्यास (उदा., “OK, Google” किंवा मायक्रोफोन आयकनला स्पर्श करणे), त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी खालील भाषण/ऑडिओ रेकॉर्डिंगवर प्रक्रिया केली जाईल. त्यासोबतच, वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सेटिंग याच्या अंतर्गत तुमच्या लहान मुलाचा व्हॉइस आणि ऑडिओ ॲक्टिव्हिटी पर्याय निवडला असल्यास, साइन-इन केलेल्या डिव्हाइसवर Assistant सोबत त्यांच्या व्हॉइस संवादाचे रेकॉर्डिंग (तसेच, काही सेकंद आधी) त्यांच्या खात्यामध्ये स्टोअर केले जाऊ शकते.

तुमच्या लहान मुलाची माहिती गोळा आणि स्टोअर करण्यासाठी आम्ही विविध तंत्रज्ञाने वापरतो, ज्यांमध्ये कुकी, पिक्सेल टॅग, ब्राउझर वेब स्टोरेज किंवा ॲप्लिकेशन डेटा कॅशेसारखे स्थानिक स्टोरेज, डेटाबेस व सर्व्हर लॉगचा समावेश आहे. तुमच्या लहान मुलाने या खाती आणि प्रोफाइलसाठी उपलब्ध असलेली Google उत्पादने व सेवा वापरण्याकरिता वाजवीपेक्षा जास्त वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता नाही.

आम्ही गोळा करत असलेली माहिती कशी वापरतो

तुमच्या लहान मुलाच्या Google खाते किंवा प्रोफाइलशी संबंधित Google गोळा करत असलेला डेटा आम्ही कसा वापरू शकतो हे Google चे गोपनीयता धोरण अधिक तपशीलवार स्पष्ट करते. सर्वसाधारणपणे, आम्ही तुमच्या लहान मुलाची माहिती पुढील गोष्टी करण्यासाठी वापरतो: आमच्या सेवा पुरवणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यात सुधारणा करणे; नवीन सेवा विकसित करणे; तुमच्या लहान मुलासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करणे; परफॉर्मन्सचे मापन करणे व आमच्या सेवा कशा वापरल्या जातात ते समजून घेणे; आमच्या सेवांच्या संदर्भात तुमच्या लहान मुलाशी थेट संवाद साधणे आणि आमच्या सेवांच्या सुरक्षिततेमध्ये व विश्वसनीयतेमध्ये सुधारणा करण्यात मदत करणे.

या उद्देशांसाठी तुमच्या लहान मुलाच्या माहितीवर प्रक्रिया करण्याकरिता आम्ही वेगवेगळी तंत्रज्ञाने वापरतो. तुमच्या लहान मुलाला कस्टमाइझ केलेले शोध परिणाम किंवा ते आमच्या सेवा कशा प्रकारे वापरतात त्यानुसार तयार केलेली इतर वैशिष्ट्ये यांसारख्या गोष्टी पुरवण्यासाठी त्यांच्या आशयाचे विश्लेषण करणाऱ्या ऑटोमेटेड सिस्टीम आम्ही वापरतो. तसेच स्पॅम, मालवेअर आणि बेकायदेशीर आशय यांसारखा गैरवापर डिटेक्ट करण्यात आम्हाला मदत व्हावी, म्हणून आम्ही तुमच्या लहान मुलाच्या आशयाचे विश्लेषण करतो. आम्ही डेटामधील पॅटर्न ओळखण्यासाठी अल्गोरिदमदेखील वापरतो. आम्ही आमच्या सिस्टीमवर आमच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या स्पॅम, मालवेअर, बेकायदेशीर आशय आणि इतर प्रकारचा गैरवापर या गोष्टी डिटेक्ट केल्यास, त्यांचे खाते किंवा प्रोफाइल बंद करू शकतो अथवा इतर योग्य कारवाई करू शकतो. ठरावीक परिस्थितींमध्ये, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे उल्लंघनाची तक्रारदेखील करू शकतो.

तुमच्या लहान मुलाच्या सेटिंग्जनुसार शिफारशी, पर्सनलाइझ केलेला आशय आणि कस्टमाइझ केलेले शोध परिणाम पुरवण्यासाठी आम्ही तुमच्या लहान मुलाची माहिती वापरू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या लहान मुलाच्या सेटिंग्जनुसार त्यांना कदाचित आवडतील अशी नवीन ॲप्स सुचवण्यासाठी, त्यांनी इंस्टॉल केलेली ॲप्स यासारखी माहिती Google Play वापरू शकते.

त्यासोबतच, तुमच्या लहान मुलाच्या सेटिंग्जनुसार, वर वर्णन केलेल्या उद्देशांसाठी आम्ही आमच्या सेवांमधून आणि तुमच्या लहान मुलाच्या सर्व डिव्हाइसमधून गोळा करत असलेली माहिती एकत्रित करू शकतो. Google च्या सेवांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी तुमच्या लहान मुलाच्या खात्याच्या किंवा प्रोफाइलच्या सेटिंग्जनुसार, इतर साइट आणि अ‍ॅप्सवरील त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी ही त्यांच्या वैयक्तिक माहितीशी संलग्न केली जाऊ शकते.

Google हे तुमच्या लहान मुलाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवणार नाही, याचा अर्थ असा आहे, की जाहिराती या त्यांच्या खात्यामधील किंवा प्रोफाइलमधील माहितीवर आधारित नसतील. त्याऐवजी, जाहिराती या तुमचे लहान मूल पाहत असलेल्या वेबसाइट किंवा अ‍ॅपचा आशय, सध्याची शोध क्वेरी अथवा सामान्य स्थान (जसे की, शहर किंवा राज्य) यासारख्या माहितीवर आधारित असू शकतात. वेब ब्राउझ करताना किंवा Google ची नसलेली ॲप्स वापरताना, तुमच्या लहान मुलाला तृतीय पक्षांनी पर्सनलाइझ केलेल्या जाहिरातींसह इतर (Google च्या नसलेल्या) जाहिरात पुरवठादारांकडून दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती दिसू शकतात.

तुमचे लहान मूल शेअर करू शकेल अशी माहिती

तुमचे लहान मूल हे त्यांच्या Google खाते किंवा प्रोफाइलवर साइन इन केलेले असताना सार्वजनिकरीत्या आणि इतरांसोबत फोटो, व्हिडिओ, ऑडिओ व स्थान यांसह माहिती शेअर करू शकेल. तुमचे लहान मूल सार्वजनिकरीत्या माहिती शेअर करते, तेव्हा ती Google Search सारख्या शोध इंजिनांद्वारे ॲक्सेस केली जाऊ शकते.

Google शेअर करत असलेली माहिती

आम्ही गोळा करत असलेली माहिती मर्यादित परिस्थितींमध्ये Google च्या बाहेर शेअर केली जाऊ शकते. पुढील परिस्थिती वगळता आम्ही Google च्या बाहेरील कंपन्या, संस्था आणि व्यक्तींसोबत वैयक्तिक माहिती शेअर करत नाही:

संमतीने

आम्ही संमतीने (लागू असेल त्यानुसार) Google च्या बाहेर वैयक्तिक माहिती शेअर करू.

तुमच्या कुटुंब गटासोबत

तुमच्या लहान मुलाचे नाव, फोटो, ईमेल ॲड्रेस आणि Play खरेदी यांसह त्यांची माहिती ही Google वर तुमच्या कुटुंब गटातील सदस्यांसोबत शेअर केली जाऊ शकते.

बाह्य प्रक्रिया करण्यासाठी

वैयक्तिक माहितीवर आमच्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता आम्ही ती आमच्या सूचनांनुसार आणि ही गोपनीयतेची सूचना, Google गोपनीयता धोरण व कोणत्‍याही इतर योग्‍य गोपनीयता आणि सुरक्षा उपाययोजना यांचे पालन करत आमच्‍याशी संलग्न असणाऱ्यांना किंवा इतर विश्‍वासार्ह व्‍यवसायांना अथवा व्‍यक्तींना पुरवतो.

कायदेशीर कारणांसाठी

माहितीचा अ‍ॅक्सेस, वापर, रक्षण, किंवा डिस्क्लोजर खाली दिलेल्या गोष्टींसाठी वाजवीरीत्या आवश्यक आहे यावर आमचा सद्भावनेने विश्वास असेल, तरच आम्ही वैयक्तिक माहिती Google च्या बाहेरील कंपन्या, संस्था अथवा व्यक्तींसह शेअर करू:

  • कोणताही लागू कायदा, नियमन, कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलबजावणी करण्यायोग्य सरकारी विनंती यांची पूर्तता करणे;

  • संभाव्‍य उल्‍लंघनांच्‍या तपासणीसह लागू सेवा अटी यांची अंमलबजावणी करणे;

  • फसवणूक, सुरक्षा किंवा तांत्रिक समस्या डिटेक्ट करणे, प्रतिबंधित करणे अथवा त्यांचे निराकरण करणे;

  • आवश्यकतेनुसार किंवा कायद्याने परवानगी असेल त्याप्रमाणे Google, आमचे वापरकर्ते अथवा लोकांचे अधिकार, मालमत्ता किंवा सुरक्षितता यांना हानी न पोहोचवता संरक्षण करणे.

आम्ही सार्वजनिकरीत्या आणि प्रकाशक, जाहिरातदार, डेव्हलपर किंवा अधिकारधारक यांसारख्या आमच्या भागीदारांसोबत वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य नसलेली माहितीदेखील (जसे की, आमच्या सेवांच्या सर्वसाधारण वापराबद्दलचे ट्रेंड) शेअर करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्‍या सेवांच्‍या सर्वसाधारण वापराबद्दलचे ट्रेंड दाखवण्यासाठी माहिती सार्वजनिकरीत्या शेअर करतो. आम्ही विशिष्ट भागीदारांना त्यांच्या स्वतःच्या कुकी किंवा त्यासारखी तंत्रज्ञाने वापरून जाहिराती आणि मापनासाठी ब्राउझर अथवा डिव्हाइसमधून माहिती गोळा करण्याची अनुमतीदेखील देतो.

तुमच्या लहान मुलाच्या वैयक्तिक माहितीचा अ‍ॅक्सेस

तुमच्या लहान मुलाकडे Google खाते असल्यास, तुम्ही त्यांच्या Google खाते मध्ये साइन इन करून त्यांची माहिती अ‍ॅक्सेस करू शकता, अपडेट करू शकता, काढून टाकू शकता, एक्सपोर्ट करू शकता आणि त्यावर प्रक्रिया करणे प्रतिबंधित करू शकता. तुम्हाला तुमच्या लहान मुलाचा पासवर्ड आठवत नसल्यास, तुम्ही तो Family Link ॲप किंवा वेबवरील Family Link सेटिंग्ज वापरून रीसेट करू शकता. साइन इन केल्यानंतर, तुमच्या लहान मुलाची गोपनीयता सेटिंग्ज आणि माहिती व्यवस्थापित करण्यात मदत व्हावी, यासाठी तुम्ही Google गोपनीयता धोरण मध्ये वर्णन केलेली Google अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल सारखी विविध नियंत्रणे वापरू शकता.

तुमच्या लहान मुलाची प्रोफाइल असल्यास, तुम्ही Family Link ॲप किंवा वेबवरील Family Link सेटिंग्ज वापरून त्यांची माहिती ॲक्सेस करू शकता, अपडेट करू शकता, काढून टाकू शकता, एक्सपोर्ट करू शकता आणि त्यावर प्रक्रिया करणे प्रतिबंधित करू शकता.

तुमचे लहान मूल "माझी अ‍ॅक्टिव्हिटी" मध्ये त्याची मागील अ‍ॅक्टिव्हिटी हटवू शकते आणि बाय डीफॉल्ट तृतीय पक्षांना (डिव्हाइसचे स्थान, मायक्रोफोन किंवा संपर्क यासारख्या गोष्टींसह) अ‍ॅप परवानग्या देऊ शकते. तुम्ही तुमच्या लहान मुलाचे Google खाते किंवा प्रोफाइल यांची माहिती संपादित करण्यासाठी अथवा त्यामध्ये फेरबदल करण्यासाठी, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि अ‍ॅप परवानग्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी व त्यांची माहिती अ‍ॅक्सेस करण्याकरिता अ‍ॅप्स किंवा तृतीय पक्षाच्या सेवांना ठरावीक परवानग्या देण्याची त्यांची क्षमता व्यवस्थापित करण्यासाठीदेखील Family Link वापरू शकता.

तुम्हाला यापुढे तुमच्या लहान मुलाची माहिती गोळा करणे किंवा वापरणे कधीही थांबवायचे असल्यास, तुम्ही Family Link ॲप अथवा वेबवरील Family Link सेटिंग्ज मधील त्यांच्या खाते अथवा प्रोफाइल माहिती पेजवर ”खाते हटवा” अथवा “प्रोफाइल हटवा” वर क्लिक करून त्यांचे Google खाते किंवा प्रोफाइल हटवू शकता. तुमच्या लहान मुलाचे खाते किंवा प्रोफाइल माहिती वाजवी कालावधीमध्ये कायमची हटवली जाईल.

आमच्याशी संपर्क साधा

तुम्हाला तुमच्या लहान मुलाच्या Google खाते किंवा प्रोफाइलशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास, आमच्याशी संपर्क साधण्यात संकोच करू नका. आम्ही मदत करण्यासाठी तत्पर आहोत. आमच्या मदत केंद्र मध्ये तुम्ही Family Link आणि तुमच्या लहान मुलाचे Google खाते किंवा प्रोफाइल याविषयी अतिरिक्त माहिती मिळवू शकता. तुम्ही Family Link ॲपमध्ये मेनू ☰ > मदत आणि फीडबॅक > फीडबॅक पाठवा वर टॅप करून किंवा आमच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधणे हे करून अथवा खालील पत्त्यावर संपर्क साधून, Family Link किंवा तुमच्या लहान मुलाचे Google खाते अथवा प्रोफाइल याविषयी आम्हाला फीडबॅकदेखील पाठवू शकता.

Google
१६०० ॲंफिथिएटर पार्कवे
माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया ९४०४३ यूएसए
फोन: +१ ८५५ ६९६ ११३१ (यूएसए)
इतर देशांसाठी, g.co/FamilyLink/Contact ला भेट द्या

Google हे तुमच्या लहान मुलाचा डेटा कसा गोळा करते व तो कसा वापरते याविषयी तुम्हाला प्रश्न असल्यास, तुम्ही Google आणि आमच्या डेटा संरक्षण ऑफिसरशी संपर्क साधू शकता. स्थानिक कायद्याच्या अंतर्गत तुमच्या अधिकारांविषयी तुम्हाला चिंता वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या स्थानिक डेटा संरक्षण प्राधिकाऱ्याशीदेखील संपर्क साधू शकता.

(तुमच्या देशातील लागू वय किंवा) १३ वर्षांखालील लहान मुलांसाठी Family Link डिस्क्लोजर पहा

Google Apps
मुख्य मेनू